बळीराजा संपावर

By Admin | Updated: June 1, 2017 01:20 IST2017-06-01T01:19:56+5:302017-06-01T01:20:09+5:30

विविध मागण्यांसाठी १ जूनपासून कळवण तालुक्यातील शेतकरी संपावर जाणार आहे.

Baliharaja strike | बळीराजा संपावर

बळीराजा संपावर

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यांसह विविध मागण्यांसाठी १ जूनपासून कळवण तालुक्यातील शेतकरी संपावर जाणार असून, कळवण येथे गुरुवारी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना किसान क्रांती मोर्चा व कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह शेतकरी बांधव मोर्चाद्वारे निवेदन देणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी बैठकीत दिली.
कळवण येथील बाजार समिती आवारात १ जूनपासूनच्या संपाबाबत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी नेते यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
शेतकरी बांधवांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून, कळवण तालुक्यातून दूध व भाजीपाला शहरी भागात जाऊ द्यायचा नाही व निर्णय होईपर्यंत पेरणी करायची नाही, असा निर्धार करण्यात येऊन शपथ घेण्यात आली.
बाजार समिती आवारात आयोजित किसान क्र ांती मोर्चाच्या शेतकरी पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी बैठकीस धनंजय पवार, रवींद्र देवरे, राजेंद्र भामरे, नारायण हिरे, पांडुरंग पाटील, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर आदी उपस्थित होते.

,शेतकरी नेते शांताराम जाधव,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपट पवार आदीसह तालुक्यातील महत्वपूर्ण पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित उपस्थितीत संपन्न झाली .
केंद्र व राज्य शासनस्तरावरु न शेतीप्रधान देशात सातत्याने शेतकरीविरोधी धोरण राबविली जात असल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे उद्योगधंदे व नोकरदारांप्रमाणे महागाई व परीस्थितीनुसार लाभ दिले जातात त्याप्रमाणे शेती हा पण एक मोठा उद्योग असल्याने शेतकर्यांनाही काळाची गरज ओळखुन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागु करावा,60 वर्षावरील शेतकर्यांना पेन्शन, दुधाला भाव, सक्षम पिकविमा,???त्न अनुदानावर ठिबक व तुषार सिंचन योजना सुरु करावी आदी प्रमुख मागण्या असून मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी शेतकरी संपावर जात असून सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी बैठकीत केले.
राज्यातील शेतकर्यांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने आता शेतकर्यांनी संपाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला असून आता आत्महत्या नाही, तर हक्कासाठी लढाईचा निर्धार बळीराजांनी केला आहे.पेरणीच्या हंगामासमोर संपावर जाण्याचा निर्णय कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवानी घेतला असून एक तर पिकत नाही आण िपिकलं तर मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी वर्गासमोरच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही.त्यावरचा उपाय म्हणून शेतकर्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेत असल्याने संपात सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन कळवण कृषी उत्पन्न बाजार समतिीचे सभापती धनंजय पवार यांनी यावेळी केले .
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, जेष्ठ सेल जिल्हाध्यक्ष रामा पाटील,
हरीभाऊ वाघ,वाय एस देशमुख, जगन्नाथ पाटील, प्रदीप पगार ,विलास रौंदळ, कैलास जाधव, सुभाष शिरोरे,शांताराम जाधव,कौतिक गांगुर्डे,संजय शेवाळे,संदीप वाघ, विनोद खैरनार, शितलकुमार आहीरे,नरेंद्र वाघ आदीसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Baliharaja strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.