शहरं
Join us  
Trending Stories
1
किती आमदार संपर्कात?; जयंत पाटलांच्या एका वाक्याने वाढवली अजित पवारांच्या पक्षाची धाकधूक!
2
काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल
3
"...तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार"; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
4
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
5
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप
6
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
7
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
8
2019 मध्ये जे घडले त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे; काळेंशी गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट 
9
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली
11
भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट
12
400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर
13
वयाच्या २५ व्या वर्षी बनल्या खासदार; कोण आहेत हे युवा चेहरे, जे संसदेत पोहचले?
14
“आमचा ८० टक्के स्ट्राइक रेट, विधानसभेला १८० जागा निवडून येतील”; जयंत पाटील यांचा दावा
15
लाचखोरीचं गुजरात मॉडेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच देण्यासाठी दिली EMI सुविधा 
16
आशिष शेलारांचा यु-टर्न, आधी म्हणाले राजकारण सोडणार, आता म्हणाले, "आधी उद्धव ठाकरेंनी राजकीय ..."
17
राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."
18
नितीश कुमारांनी मागितली 'ही' ३ महत्त्वाची खाती; भाजपाची वाढणार डोकेदुखी?
19
सुप्रिया सुळेंविरोधात नामदेवराव जाधवांना, अन् बिचुकलेंना कल्याण, साताऱ्यात किती मते मिळाली? आकडा पाहून काय म्हणाल
20
लग्न कधी करणार? ऋषी सक्सेनाने घेतलं ईशाचं नाव; म्हणाला, "मी तयारच आहे पण...

बलिप्रतिपदानिमित्त बळीराजा गौरव रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:34 AM

बलिप्रतिपदानिमित्त दिवाळीच्या दिवशी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने बळीराजा गौरव रॅली काढण्यात आली होती. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

नाशिक : बलिप्रतिपदानिमित्त दिवाळीच्या दिवशी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने बळीराजा गौरव रॅली काढण्यात आली होती. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.  या रॅलीत महाराष्ट्र किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय किसान सभा, नाशिक मनपा श्रमिक सभा, नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती सेल, एआयएसएफ, आम आदमी पार्टी, नाथपंथीय संस्था, नागवंशीय संस्था, भारतीय बौद्ध महासभा आदींसह अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.आम्ही सारे नागवंशीय संस्थेच्या शाहिरी पथकाने गौरव रॅलीत विविध प्रबोधनपर गीतांचा जागर करीत बळीराजाचा गुणगौरव करत चैतन्य निर्माण केले. बळीराजा गौरव रॅलीची परंपरा याही वर्षी टिकून ठेवत, ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो! अशी आर्त हाक देत, बळीराजा गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अत्याचारविरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक राहुल तुपलोंढे यांनी उद्देश स्पष्ट केला. यावेळी राजू देसले, सुनील मालुसरे, हंसराज वडघुले पाटील, ज्ञानेश्वर काळे, सागर निकम, अविनाश आहेर, विजय पाटील, महेश पगारे, संविधान गायकवाड, मनोज चोपडे, संजय मोकळ, धर्मराज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी क्रांतिज्योती पारखे, नारायण घाटकर व विकी गायधनी यांना विद्रोही रत्न २0१८ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी दिलीप लिंगायत (बळीराजा वेशभूषा), योगेश बर्वे (शेतकरी वेशभूषा) या जीवंत देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले होता. बळीराजा गौरवपर घोषणा व विविध क्रांतिकारी गीते रॅलीत सादर करण्यात आली. या रॅलीला इदगाह मैदानापासून सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालय मार्गे त्र्यंबक नाका सिग्नल, जिल्हा परिषद कार्यालय, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, खडकाळी सिग्नल मार्गे रॅली शालिमार चौकात आली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला.

 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक