पिंपळगाव बसवंत : निफाड तालुल्यातील पालखेड मिरचीचे येथे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील बालगोपाळांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने बालजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र मात दिवसभर विविध करमणुकीचे कार्यक्र म झाले. तर स्पर्धेत सहभागी मुलांवर ग्रामस्थांनी बक्षिसांची खैरात केली.संघर्ष ग्रुप, एस. एस. अकॅडमी व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. उद्घाटन सरपंच रवींद्र कोकाटे, उपसरपंच लक्ष्मीबाई थेटे व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समीर थेटे, प्रमोद सासवडे, मनोज लोंढे, महेश निकम, राजेश थेटे, एकनाथ गांगुर्डे, सागर निरभवणे, सचिन गांगुर्डे, शिवराज थेटे, ज्ञानेश्वर थेटे, रईस शेख, गौतम हिरे, प्रकाश थेटे, श्रीकांत हिरे, संतोष आहेर, संदीप काळे, श्याम चौधरी आदी उपस्थित होते.
पालखेड मिरचीचे येथे बालजत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 18:03 IST