बागलाण तालुका पेन्शनर्स असोसिएशनअध्यक्षपदी बाजीराव पाटील बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:28 IST2021-07-21T00:06:47+5:302021-07-21T01:28:41+5:30
जोरण : बागलाण तालुका पेन्शनर्स असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यमान सरचिटणीस बाजीराव पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

बागलाण तालुका पेन्शनर्स असोसिएशनअध्यक्षपदी बाजीराव पाटील बिनविरोध
ठळक मुद्देनविन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
जोरण : बागलाण तालुका पेन्शनर्स असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यमान सरचिटणीस बाजीराव पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
असोसिएशनचे विद्यमान सरचिटणीस बाजीराव पाटील यांची सर्व सदस्यांनी कार्यकारणीच्या निवडणूक प्रसंगी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केली.
यावेळी असोसिएशनचे मावळते अध्यक्ष प्रकाश बधान, उपाध्यक्ष उत्तम रौंदळ, कोषाध्यक्ष डी. के. अहिरे, संघटक बाळासाहेब देवरे तसेच सेवानिवृत्त शिक्षक यावेळी उपस्थित होते. विद्यमान कार्यकारणीच्या हस्ते नविन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. (२० बाजीराव पाटील)