आज शहरात बहुजन क्र ांती मोर्चा
By Admin | Updated: January 3, 2017 00:59 IST2017-01-03T00:58:49+5:302017-01-03T00:59:13+5:30
बी. डी. भालेकर मैदानावरून सुरुवात : ६३ संघटना येणार एकत्र

आज शहरात बहुजन क्र ांती मोर्चा
नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाजात त्यांच्या अधिकारांविषयी जनजागृती करण्यासाठी बहुजन क्र ांती मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६३ संघटना एकत्रित येत मंगळवारी (दि. ३) शहरातून मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा कोणत्याही जातीच्या विरोधात नसून बहुजन समाजाच्या अधिकारांसाठी मोर्चा काढण्यात येत असल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. बी. डी. भालेकर मैदान येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरु वात होणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. महापुरुषांचे फोटो असलेले स्टिकर्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गंजमाळ सिग्नलमार्गे शालिमार चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. पुढे सीबीएस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी गोल्फ क्लब मैदान येथे व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)