भाव कोसळूनही बागलाणला कांदा लागवड जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 18:58 IST2019-02-05T18:57:38+5:302019-02-05T18:58:20+5:30

खमताणे : शेतकरी ज्या शेतमालातुन जास्त पैसे मिळतील तोच शेतीमाल पिकण्यावर भर देतो. कांदा रडवोतही आणि हसवतोही तरीही शेतकरी कांदा पिकाला सोडायला तयार नाही. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात मोसम व आरम खोरे परिसरात पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने फळबागापेक्षा भाजीपाल्यावर जास्त भर दिला जातो. मात्र शेतकरी इतका कांदा विकला जात असतानाही शेतामध्ये कांदा लागवड जोमात करतो आहे.

 Baglan planting onion plantations | भाव कोसळूनही बागलाणला कांदा लागवड जोमात

भाव कोसळूनही बागलाणला कांदा लागवड जोमात

ठळक मुद्देभाव वाढण्याची आशा ; रब्बी पिकांकडे पाठ

खमताणे : शेतकरी ज्या शेतमालातुन जास्त पैसे मिळतील तोच शेतीमाल पिकण्यावर भर देतो. कांदा रडवोतही आणि हसवतोही तरीही शेतकरी कांदा पिकाला सोडायला तयार नाही. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात मोसम व आरम खोरे परिसरात पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने फळबागापेक्षा भाजीपाल्यावर जास्त भर दिला जातो. मात्र शेतकरी इतका कांदा विकला जात असतानाही शेतामध्ये कांदा लागवड जोमात करतो आहे.
यास शेतकऱ्यांची चक्क रब्बी पिके घेणे बंद केल्याने आपल्याला सर्वच प्रकारच्या डाळी शंभर रु पयांच्या पुढे जाताना दिसु लागले आहे. बाजरीचे भाव गगनाला भिडले आहेत. असे असताना बागलाण तालुक्यातील शेतकºयांनी रब्बी पिके म्हणजे गहू, हरभरा याकडे पाठ फिरवल्याचे दिसुन येते.
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी कांदा म्हणजे नाशिक, अशी ओळख असलेल्या कांदा आज मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि जिल्ह्यात ज्या भागात कांदा उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. आज तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने कांदा हे पीक गादा पद्धतीने घेतल्याने कमी पाणी आणि उत्पादनात वाढ झाली आहे. आज मातीमोल भाव असताना कांदा लागवड थांबायचे नाव घेत नाही.
आज शेतात काय पिके घ्यावीत, हा मोठा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. सर्वांनी एक पिक लावण्यापेक्षा सर्व प्रकारची पिके घ्यावीत. यामुळे धान्य उत्पादन होईल, याकडे शेतकºयांनी लक्ष द्यावे.
- चंद्रशेखर सोनवणे, शेतकरी.
काही शेतकºयांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्याला भाव राहिल या अपेक्षेने हरभरा व गहु या पिकांकडे पाठ फिरवून कांदा लागवडीकडे भर दिला आहे.
- महेश बागुल, खमताणे. (फोटो ०५ कांदा)

Web Title:  Baglan planting onion plantations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा