शहा ते वावी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 16:25 IST2020-11-11T16:25:01+5:302020-11-11T16:25:53+5:30

पाथरे - सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शहा ते वावी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

Bad condition of road from Shah to Wavi | शहा ते वावी रस्त्याची दुरवस्था

सिन्नर तालुक्यात शहा ते वावी या रस्त्याची झालेली दुर्दशा.

ठळक मुद्देमोठी वाहने या रस्त्यावरून चालूच शकत नाही.

पाथरे - सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शहा ते वावी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
शहा पासून वावी हे साधारण आठ किलोमीटर अंतरावर आहे. या दरम्याच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्तीही झालेली नाही. या रस्त्याची खडी उघडी पडली असून या रस्त्याचे मूळ रूपच गायब झाले आहे. शहा गावातील ग्रामस्थाना बाजार पेठेचे गाव म्हणून वावीला जावे लागते. शहा ते वावी हा शहाकरांसाठी जवळचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे आता लांबचा वाटत आहे.

    या रस्त्यावर वाहन चालविणे जिकरीचे होत आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरून तर जातांनाही दिसत नाही. मोठी वाहने या रस्त्यावरून चालूच शकत नाही. दु चाकी वाहनांचे अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावरून झाले. रस्त्याची माती, खडी यावरून दु चाकी वाहने सरकतात त्यात अनेकांना इजा झाली आहे. मोठं मोठे खड्डे, टपऱ्या यामुळे वाहन चालक त्रासले आहेत. व्यावसायिक, दुकानदार, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक प्रवासी मिठसागरे मार्गे वावीला जाणे पसंद करत आहे. या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. ग्रामस्थ, प्रवासी, वाहन चालक यांनी या रस्ताची दुरुस्तीची मागणी केली आहे.
 

Web Title: Bad condition of road from Shah to Wavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.