ब्राह्मणवाडे - माळेगाव रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:04+5:302021-09-26T04:15:04+5:30
सिन्नर : ब्राह्मणवाडे - वडझिरे - माळेगाव एमआयडीसी रस्ता पूर्ण खराब झाला असून, परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. रस्त्यावर ...

ब्राह्मणवाडे - माळेगाव रस्त्याची दुरवस्था
सिन्नर : ब्राह्मणवाडे - वडझिरे - माळेगाव एमआयडीसी रस्ता पूर्ण खराब झाला असून, परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. रस्त्यावर तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी वडझिरे ग्रामविकास समितीतर्फे करण्यात आली आहे. ब्राह्मणवाडे-माळेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, पावसाळ्यात चिखल-गाळ साचल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत असून, अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापारी वडझिरे येथे येण्याचे टाळत आहे. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे रस्ता दुरुस्तीत अडथळे होत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. वडझिरे गावाने पानी फाउंडेशन, ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड, पाणलोट विकास कार्यक्रमात पारितोषिक मिळवले. मात्र खराब रस्त्यापुढे हतबल आहे. ग्रामस्थ ग्रामपंचायतीवर राग काढत आहे. संबंधित विभागाने, लोकप्रतिनिधींनी रस्त्याचे डांबरीकरण, पुलाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष अशोक नागरे, सरपंच सुनीता आंबेकर, उपसरपंच मनोहर बोडके, भास्कर ठोंबरे, शिवाजी बोडके, बाळू बोडके, रंभाजी बोडके, रामेश्वर बोडके, संगत गायकवाड, शिवाजी बोडके, जगदीश कापसे, अंकुश गिते आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.
चौकट... पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष आठ ते दहा किमीचा रस्ता एकाच वेळी डांबरीकरण करावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र, नायगाव घाट ते वडझिरे हा १०० मीटरचा रस्ताही डांबरीकरण होत नाही. गावाजवळ पूल करावा, अशी मागणी होत आहे. मुख्य रस्ता आजपर्यंत सुधारलेला नसून मोह, नायगाव, जायगाव जोडरस्ता व वस्ती रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. (२४ रस्ता) ब्राह्मणवाडे-माळेगाव रस्त्याची झालेली दुरवस्था.
240921\153724nsk_18_24092021_13.jpg
ब्राम्हणवाडे-माळेगाव रस्त्याची दुरवस्था.