शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:36 PM

निफाड : शनिवारी (दि १६) रात्री नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाड येथील आचोळा नाला येथे रस्ता क्र ॉस करणाऱ्या बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यु झाला आहे.

ठळक मुद्देनिफाड येथील तरु णांनी रु ग्णवाहिका मागवून वन विभागाच्या ताब्यात दिले.

निफाड : शनिवारी (दि १६) रात्री नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाड येथील आचोळा नाला येथे रस्ता क्र ॉस करणाऱ्या बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यु झाला आहे.शनिवारी रात्री ८च्या सुमारास निफाडपासून एक ते दीड किमी अंतरावर शिवरें फाट्याजवळ आचोळा नाल्याजवळ बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर सदर बछडा गंभीर जखमी झाला.यावेळी रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलेल्या या बिबट्याच्या बछड्याला या रस्त्याने जाणाºया गणेश फापाळे, प्रसाद फापाळे, संदेश फापाळे रा. मरळगोई, तालुका निफाड येथील तरु णांनी रु ग्णवाहिका मागवून निफाड येथील वन विभागाच्या ताब्यात दिले.या बछड्याला निफाड येथील वनविभागाच्या नर्सरीत आणण्यात आले. येथे त्याच्यावर डॉ. साबळे यांनी प्राथमिक उपचार केले. पण बछड्याला जास्त मार लागला असल्याने सहाय्यक वनसंरक्षक डॉ. नेवसे, येवला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व सहकाऱ्यांनी नाशिक येथे पशु वैद्यकीय रु ग्णालयात आणले.या ठिकाणी डॉ. पवार यांनी उपचार सुरू केले मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी रात्री ११ च्या दरम्यान या बछड्याचा मृत्यू झाला.निफाड येथे वन विभागाच्या नर्सरीत आणून शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर निफाड येथील नविभागाच्या नर्सरीत दाहसंस्कार करण्यात आला. त्याच्या मणक्याला, जबड्याला जोराचा मार लागला होता. त्याला वाचविण्यासाठीचे प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही, सव्वा वर्षा हा नर बिबट्या असल्याचे संजय भंडारी यांनी सांगितले.चौकट-दरम्यान शनिवार दि २ नोव्हेंबर रोजी याच अपघातस्थळापासून २ किमी अंतरावर नैताळे येथे शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ५ वर्ष वयाचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळला होता. त्याला जखमा होऊन त्या अधिकच चिघळल्या होत्या. शिवरे फाटा आणि नैताळे परिसरात अवघ्या १५ दिवसाच्या अंतरात १ बिबट्या व १ बछडे मृत झाले आहे.वेगमर्यादा पाळा; प्राण वाचवासायखेडा ते निफाड व तेथून पुढे थेट येवला राजापूर-ममदापूरपर्यंत बिबट, काळवीट, तरस, लांडग्यांसारख्या वन्यजीवांचा वावर आहे. त्यामुळे हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. वाहनचालकांनी सायंकाळनंतर या भागातून मार्गस्थ होताना कमाल वेगमर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे, जेणेकरून मुक्या जीवांचा प्राण वाचेल आणि आपला प्रवासही सुरक्षित होण्यास मदत होईल. पाठीच्या मणक्यांना व जबड्याला जबर मुका मार लागल्याने बछडा मृत्यूमुखी पडल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले.-संजय भंडारी, वनक्षेत्रपाल.(फोटो १७ बिबट्या) 

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरी