वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:38 IST2019-11-17T22:36:15+5:302019-11-17T22:38:05+5:30
निफाड : शनिवारी (दि १६) रात्री नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाड येथील आचोळा नाला येथे रस्ता क्र ॉस करणाऱ्या बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यु झाला आहे.

वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यु
निफाड : शनिवारी (दि १६) रात्री नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाड येथील आचोळा नाला येथे रस्ता क्र ॉस करणाऱ्या बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यु झाला आहे.
शनिवारी रात्री ८च्या सुमारास निफाडपासून एक ते दीड किमी अंतरावर शिवरें फाट्याजवळ आचोळा नाल्याजवळ बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर सदर बछडा गंभीर जखमी झाला.
यावेळी रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलेल्या या बिबट्याच्या बछड्याला या रस्त्याने जाणाºया गणेश फापाळे, प्रसाद फापाळे, संदेश फापाळे रा. मरळगोई, तालुका निफाड येथील तरु णांनी रु ग्णवाहिका मागवून निफाड येथील वन विभागाच्या ताब्यात दिले.
या बछड्याला निफाड येथील वनविभागाच्या नर्सरीत आणण्यात आले. येथे त्याच्यावर डॉ. साबळे यांनी प्राथमिक उपचार केले. पण बछड्याला जास्त मार लागला असल्याने सहाय्यक वनसंरक्षक डॉ. नेवसे, येवला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व सहकाऱ्यांनी नाशिक येथे पशु वैद्यकीय रु ग्णालयात आणले.
या ठिकाणी डॉ. पवार यांनी उपचार सुरू केले मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी रात्री ११ च्या दरम्यान या बछड्याचा मृत्यू झाला.
निफाड येथे वन विभागाच्या नर्सरीत आणून शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर निफाड येथील नविभागाच्या नर्सरीत दाहसंस्कार करण्यात आला. त्याच्या मणक्याला, जबड्याला जोराचा मार लागला होता. त्याला वाचविण्यासाठीचे प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही, सव्वा वर्षा हा नर बिबट्या असल्याचे संजय भंडारी यांनी सांगितले.
चौकट-
दरम्यान शनिवार दि २ नोव्हेंबर रोजी याच अपघातस्थळापासून २ किमी अंतरावर नैताळे येथे शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ५ वर्ष वयाचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळला होता. त्याला जखमा होऊन त्या अधिकच चिघळल्या होत्या. शिवरे फाटा आणि नैताळे परिसरात अवघ्या १५ दिवसाच्या अंतरात १ बिबट्या व १ बछडे मृत झाले आहे.
वेगमर्यादा पाळा; प्राण वाचवा
सायखेडा ते निफाड व तेथून पुढे थेट येवला राजापूर-ममदापूरपर्यंत बिबट, काळवीट, तरस, लांडग्यांसारख्या वन्यजीवांचा वावर आहे. त्यामुळे हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. वाहनचालकांनी सायंकाळनंतर या भागातून मार्गस्थ होताना कमाल वेगमर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे, जेणेकरून मुक्या जीवांचा प्राण वाचेल आणि आपला प्रवासही सुरक्षित होण्यास मदत होईल. पाठीच्या मणक्यांना व जबड्याला जबर मुका मार लागल्याने बछडा मृत्यूमुखी पडल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले.
-संजय भंडारी, वनक्षेत्रपाल.
(फोटो १७ बिबट्या)