बिबट्याचा वासरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:57 IST2020-03-16T00:56:14+5:302020-03-16T00:57:04+5:30
दाभाडी येथील स्मशान घाटाजवळ असलेल्या शेतात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने मधुकर केवळ निकम यांच्या वासरावर हल्ला करुन गंभीर जखमी केले.

बिबट्याचा वासरावर हल्ला
दाभाडी : येथील स्मशान घाटाजवळ असलेल्या शेतात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने मधुकर केवळ निकम यांच्या वासरावर हल्ला करुन गंभीर जखमी केले.
याप्रकरणी छावणी पोलिसांसह वनविभागास कळविण्यात आले. दुपारी संबंधित पोलिसांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या भागात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले असून त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात
येणार असल्याची माहिती छावणीचे पोलीस निरीक्षक वाडीले यांनी
दिली.