नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या वैद्यकिय संघटनेने राष्टÑीय पातळीवर स्वतंत्ररित्या बोधचिन्हाचे भारत सरकारकडून पेटंट मिळविले आहे. सदर बोधचिन्ह अॅलोपॅथी उपचारपध्दतीचा अवलंब करणारे व संस्थेकडे नोेंदणीकृत असलेल्या डॉक्टरांना वापरता येणार असल्याची माहिती संघटनेचे शहराध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी दिली आहे.डॉक्टरांकडून यापुर्वी दोन वेगवेगळ्या बोधचिन्हांचा वापर केला जात होता. अॅलोपॅथीमधील तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये बोधचिन्ह नेमके कोणते वापरावे, याबाबत संभ्रम होता. सदर संभ्रम दूर व्हावा, यासाठी आयएमएकडून राष्टÑीय स्तरावर एक स्वतंत्र बोधचिन्ह भारतीय पेटंट कायद्यान्वये नोंदणी केला आहे. या बोधचिन्हाचा वापर आयएमएच्या सदस्यांना क रता येणार आहे. शहरात सुमारे दोन हजार अॅलोपॅथीद्वारे उपचार करणारे डॉक्टर आयएमएचे सदस्य आहे तसेच जिल्ह्यात साडेतीन हजार डॉक्टर सदस्य आहेत. हे बोधचिन्ह यापुढे नोंदणीकृत डॉक्टरांची हमी देणारे ठरणार आहे.
आयएमए’च्या स्वतंत्र बोधचिन्हाचे पेटंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 21:58 IST
नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या वैद्यकिय संघटनेने राष्टÑीय पातळीवर स्वतंत्ररित्या बोधचिन्हाचे भारत सरकारकडून पेटंट मिळविले आहे. सदर बोधचिन्ह अॅलोपॅथी उपचारपध्दतीचा अवलंब करणारे व संस्थेकडे नोेंदणीकृत असलेल्या डॉक्टरांना वापरता येणार असल्याची माहिती संघटनेचे शहराध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी दिली आहे.डॉक्टरांकडून यापुर्वी दोन वेगवेगळ्या बोधचिन्हांचा वापर केला जात होता. अॅलोपॅथीमधील ...
आयएमए’च्या स्वतंत्र बोधचिन्हाचे पेटंट
ठळक मुद्दे स्वतंत्ररित्या बोधचिन्हाचे भारत सरकारकडून पेटंट यापुर्वी दोन वेगवेगळ्या बोधचिन्हांचा वापर केला जात होताबोधचिन्हाचा वापर आयएमएच्या सदस्यांना क रता येणार आहे