साथरोगाच्या बचावासाठी युवकाकडून जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 17:10 IST2018-10-05T17:10:20+5:302018-10-05T17:10:35+5:30

सामाजिक पुढाकार : म्हाळसाकोरेत स्वखर्चाने मास्क वाटप

Awareness from the youth for the prevention of disease | साथरोगाच्या बचावासाठी युवकाकडून जागृती

साथरोगाच्या बचावासाठी युवकाकडून जागृती

ठळक मुद्देदमट हवामान आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे गोदाकाठ भागातील अनेक गावांत साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे

सायखेडा : गोदाकाठ परिसरात मोठया प्रमाणात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून काही रोग संसर्गजन्य तर काही रोग हवेमार्फत पसरत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून म्हाळसाकोरे येथील विक्र म मुरकुटे या तरु णाने गावात ३०० मास्कचे वाटप करून नागरिकांना जागृत केले आहे.
कमी पर्जन्यमान असल्याने दमट हवामान आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे गोदाकाठ भागातील अनेक गावांत साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची उदासीनता तसेच आरोग्याची काळजी कशी आणि कोणत्या प्रकारे घ्यावी यासाठी उद्बोधनाची गरज असल्याने म्हाळसाकोरे येथील तरु ण विक्र म मुरकुटे याने त्यासाठी सामाजिक पुढाकार घेतला आहे. गोदाकाठ भागातील रामनगर येथे पंधरा दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूने दोन रु ग्ण दगावले तर तीन दिवसांपूर्वी मांजरगाव येथे एक रु ग्ण दगावल्याने परिसरात आरोग्य विभागामार्फत प्रबोधन केले जात आहे. नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून सामुदायिक रीतीने या रोगांना पळवून लावले पाहिजे यासाठी अनेक तरु ण पुढे येत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक अद्यापही मास्क वापरत नाही. शाळेतील मुले कोणताही रु मालअथवा मास्क घेऊन येत नाहीत त्याकरीता मुरकुटे यांनी पुढाकार घेतला असून आपल्या गावातील तरु ण,शाळेतील मुले, शिक्षक यांना स्वखर्चाने ३०० मास्कचे वाटप केले आहे.
घराघरात मास्क पोहोचले पाहिजे
स्वाइन फ्लू आणि डेंग्यू या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात सुरु असून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अद्याप या रोगांचा बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी घराघरात मास्क पोहोचले पाहिजे. यासाठी गावातील तरु ण, शाळेतील मुले यांना मास्क वाटप केले आहेत.
- विक्र म मुरकुटे, म्हाळसाकोरे

Web Title: Awareness from the youth for the prevention of disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.