टाकेदला कोरोना लसीकरणाची जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:34 IST2021-04-28T21:25:18+5:302021-04-29T00:34:00+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील टाकेद, बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडीतील ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन सुरक्षित अंतर ठेवत कोरोना कोविशिल्ड लसीकरणासंदर्भात जनजागृती केली जात आहे.

कोरोना लसीकरणासंदर्भात ग्रामस्थांना घरोघरी जाऊन मार्गदर्शन करताना अंगणवाडी सेविका ज्योती भवारी, आशा भालेराव, राजूबाई गोडे आदी.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील टाकेद, बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडीतील ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन सुरक्षित अंतर ठेवत कोरोना कोविशिल्ड लसीकरणासंदर्भात जनजागृती केली जात आहे.
आरोग्यसेविका बी. एन. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका ज्योती भवारी, आशा भालेराव, अनिता गायकवाड, राजूबाई घोडे, सुमन मराडे, तारा परदेशी, रिता परदेशी, सुनीता जाधव यांच्यासह आशासेविका विजया बांबळे, सुनीता धादवड घरोघरी जाऊन तापमान तपासणीसह कोविड लसीकरणाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जे. साबळे, एस. भारमल, एम. आर. पिंगटे, मुख्याध्यापक एन. आढाव, आर. एन. लोहकरे, एस. डी. नवले, के. जे. गरुड, जे. जि. गांगड आदीही कार्यरत आहेत.