हरसूल येथे सोशल मीडियाद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:03 IST2020-04-14T23:09:07+5:302020-04-15T00:03:57+5:30
वेळुंजे : देशात कोरोना विषाणू संसर्गाने धुमाकूळ घातल्याने केलेल्या लॉकडाउनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासनाच्या नियमांचे पालन करीत ...

हरसूल येथे सोशल मीडियाद्वारे जनजागृती
वेळुंजे : देशात कोरोना विषाणू संसर्गाने धुमाकूळ घातल्याने केलेल्या लॉकडाउनमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासनाच्या नियमांचे पालन करीत हरसूल परिसरात घरीच साधेपणाने साजरी करत जनजागृती करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य राहुल शार्दुल यांनी घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संदीप शार्दुल यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अश्विनी शार्दुल, राणी शार्दुल आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे घरातच भीमजयंती साजरी करण्यात आली. सुनील काशीद, किरण काशीद, राहुल काशीद आदी तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत घरातच भीम जयंती साजरी करण्याच्या आवाहनास प्रतिसाद मिळाला. तर हरसूल येथील पोपट महाले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.