जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:37 IST2019-12-03T17:37:00+5:302019-12-03T17:37:38+5:30
निफाड: निफाड येथील गणपतदादा मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबीन क्लब आण िनिफाड उपजिल्हारु ग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने मोरे महाविद्यालय येथून एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

जागतिक एड्स दिनानिमत निफाड येथे काढण्यात आलेल्या रॅलीचा प्रारंभ हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करताना डॉ.सुनील राठोर , प्राचार्य आर एन भवरे , सोबत विद्यार्थी.
निफाड: निफाड येथील गणपतदादा मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबीन क्लब आण िनिफाड उपजिल्हारु ग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने मोरे महाविद्यालय येथून एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक एड्स दिनानिमित्त निफाड उपजिल्हा रु ग्णालय निफाड येथे नटरंग कला पथकातर्फे शहाजान मुखेरी यांनी एच.आय.व्ही /एड्स या आजाराबाबत गीते गाऊन प्रबोधन केले .या प्रसंगी नगर पंचायत, निफाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे, नगर अभियंता, भालचंद्र शिरसागर, भाग्यश्री सोनवणे, हर्षवर्धन मोहिते, नितीन भंवर, दिनेश सोनवणे, सचिन काटकर,डॉ.सी.ए.पाटील, डॉ.कटारे, वैशाली नागरे, अधिपरीचारिका उपस्थित होते