ग्राहकांना हक्कांची जाणीव झाली तरच जागरूकता
By Admin | Updated: September 21, 2016 23:02 IST2016-09-21T23:02:12+5:302016-09-21T23:02:39+5:30
ग्राहकांना हक्कांची जाणीव झाली तरच जागरूकता

ग्राहकांना हक्कांची जाणीव झाली तरच जागरूकता
नाशिक : बदलत्या जीवनशैलीमुळे खाद्यपदार्थांपासून दैनंदिन वापराच्या अनेक उत्पादनांसाठी आपण किंमत मोजतो. यावेळी हक्कांविषयी जागरूकता राहिल्यास ग्राहक हाच राजा ठरेल, असे ग्राहक जनजागृती शिबिरातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेने आयोजित केलेल्या ‘ग्राहक फसवणूक विरुद्ध जनजागृती’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, धान्य वितरण अधिकारी सुभाष भाटे, संस्थेचे पदाधिकारी दिनेश भंडारे, स्टिव्हन फर्नांडिस, आनंदिता कोहूर आदि उपस्थित होते. ग्राहकांनी पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना अॅगमार्क असलेले पदार्थ घेणे, इलेक्ट्रीकल साहित्यासाठी बीईई रेटिंग पाहणे, आयएसआय मार्कची उत्पादने खरेदी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहक जागृतीबाबत माहितीपट दाखविण्यात आले. शिबिरामध्ये ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.