दरेगावी दुचाकीवरून केली जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:02 IST2020-05-29T23:12:34+5:302020-05-30T00:02:21+5:30
चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाउनमुळे पोलीस यंत्रणा बंदोबस्तात अडकली आहे. ग्रामीण भागातील गस्ती सध्या बंद आहे. अशा परिस्थितीत पोलीसपाटील व ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्य व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देत असल्याचे चित्र पहावयाला मिळत आहे.

दरेगावी दुचाकीवरून केली जनजागृती
दरेगाव : चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाउनमुळे पोलीस यंत्रणा बंदोबस्तात अडकली आहे. ग्रामीण भागातील गस्ती सध्या बंद आहे.
अशा परिस्थितीत पोलीसपाटील व ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्य व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देत असल्याचे चित्र पहावयाला मिळत आहे. गेल्या २२ मार्चपासून देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू आहे. सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत चोरटे सक्रिय झाले आहे. शहरामध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याने चोरटे ग्रामीण भागात लक्ष करीत आहेत.
तालुक्यातील पूर्व भागातील शिंगवे, रायपूर, निंबाळे, साळसाने, वडगाव पंगू, भडाणे या परिसरात घरफोड्या व लुटमारीचे प्रकार घडत आहेत. अशी पोस्ट सोशल मीडियाद्वारे फिरत आहे. चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता तालुक्यातील पोलीसपाटील व ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य जनतेला वाड्यावस्त्यांवर जाऊन सतर्क राहण्याच्या सूचना करत आहे. रात्री-बेरात्री कुणी अनोळखी इसम आढळून आल्यास त्याची त्वरित माहिती द्यावे, असे आवाहन केले जात आहे. शेतामध्ये वास्तव्य करणाºया नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असा सल्ला दिला जात आहे. ग्रामसक्षक दलाचे जवान सदस्य आपल्या गाव परिसरात दररोज ग्रस्त घालत आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त घालवावी, अशी मागणी केली जात आहे.
घरफोडी व चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दरेगावचे पोलीसपाटील सोमनाथ गांगुर्डे व ग्रामपंचायत कर्मचारी उत्तम खरात यांनी जनजागृती सुरू केली आहे. गावालगतच्या वाड्यावस्त्यांवर दुचाकीवरून फिरत ध्वनिक्षेपकाव्दारे संवाद साधत आहे. नागरिकांनी आपले भ्रमणध्वनी बंद ठेवू नये. संकटकाळात एकमेकाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन केले जात आहे.