अवयवदानाविषयी जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:31 IST2020-01-11T23:17:40+5:302020-01-12T01:31:47+5:30

पिंपळगाव बसवंत : आपल्या समाजात अवयवदानाविषयी अज्ञान आणि गैरसमज आहेत. अवयवदान म्हणजे गरजू लोकांना जीवनदान देणे होय. या चळवळीविषयी ...

Awareness about organ donation should be made | अवयवदानाविषयी जनजागृती करावी

शिरवाडे वणी येथे श्रमसंस्कार शिबिरात बोलताना संजय रकिबे. समवेत अशोक सोनवणे, ज्ञानोबा ढगे, राणी जगताप, अश्विनी निरगुडे आदी.

ठळक मुद्देसंजय रकिबे । पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर

पिंपळगाव बसवंत : आपल्या समाजात अवयवदानाविषयी अज्ञान आणि गैरसमज आहेत. अवयवदान म्हणजे गरजू लोकांना जीवनदान देणे होय. या चळवळीविषयी स्वयंसेवकांनी जनजागृती करावी, असे आवाहन झेडटीसीसीचे समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी केले.
येथील के. के. वाघ महाविद्यालय आणि वडनेरभैरव महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवाडे वणी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विस्तार अधिकारी के. डी. गाधड, प्रा. अशोक सोनवणे, दिलीप खैरे, प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. सचिन कुशारे, प्रा. विलास जाधव, शोभा दहन, उज्ज्वला डेरे, राणी जगताप, व मनीषा सोनवणे यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक भीमराज गायकवाड यांनी केले.

Web Title: Awareness about organ donation should be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.