राजापूरचे साजिद सय्यद सेना मेडलने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 20:16 IST2021-03-15T18:58:24+5:302021-03-15T20:16:29+5:30

राजापूर : येथील रहिवासी व सध्या जम्मू काश्मीर येथे सेवेत असलेल्या साजिद इब्राहिम सय्यद या सैनिकाने जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल सैन्य दलाकडून त्यांना सेना मेडलने सन्मानित करण्यात आले.

Awarded Sajid Syed Sena Medal of Rajapur | राजापूरचे साजिद सय्यद सेना मेडलने सन्मानित

राजापूरचे साजिद सय्यद सेना मेडलने सन्मानित

ठळक मुद्देदोन आतंकवादी ठार : बहादुरीबद्दल गौरव

राजापूर : येथील रहिवासी व सध्या जम्मू काश्मीर येथे सेवेत असलेल्या साजिद इब्राहिम सय्यद या सैनिकाने जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल सैन्य दलाकडून त्यांना सेना मेडलने सन्मानित करण्यात आले.

जम्मू काश्मीर येथे राजपूत रेजिमेंट्सच्या ४४ बटालियन राष्ट्रीय रायफल्समध्ये येवला तालुक्यातील राजापूर येथील जवान साजिद सय्यद कार्यरत आहेत. २२ जानेवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधील एका गावात आतंकवादी लपले असल्याची गुप्त वार्ता मिळाल्यानंतर साजिद सय्यद यांची टीम त्या गुप्त ठिकाणाजवळ पोहोचली.

भारतीय सैन्य आल्याची चाहूल लागताच आतंकवाद्यांनी भारतीय सैनिकांवर गोळीबार सुरू केला. सय्यद यांच्या टीमने जोरदार प्रत्युत्तर देत आतंकवाद्यांना ते ठिकाण सोडून जाण्यास भाग पाडले. त्यातील एक आतंकवादी पळून जात असताना साजिदने त्यास टिपले. दुसराही जोरदार गोळीबार करीत पळत असताना जीवाची पर्वा न करता साजिद सय्यद यांनी त्याचा पाठलाग करून त्यालाही ठार केले.

जम्मू काश्मीर येथे उत्कृष्ट कामगिरी बजावत बुद्धी तत्परता, प्रेरणादायी नेतृत्व व वीरतेचे दर्शन घडविल्याबद्दल साजिद सय्यद यांना सेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. राजापूर येथील जवानाच्या बहादुरीची बातमी सोशल मीडियावरून व्हायरल होताच त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: Awarded Sajid Syed Sena Medal of Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.