शिरीष कुलकर्णी यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:11 IST2020-12-09T04:11:56+5:302020-12-09T04:11:56+5:30

महाराष्ट्र सेनेच्या वतीने अभिवादन नाशिक : अखिल भारतीय महाराष्ट्र सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात ...

Award to Shirish Kulkarni | शिरीष कुलकर्णी यांना पुरस्कार

शिरीष कुलकर्णी यांना पुरस्कार

महाराष्ट्र सेनेच्या वतीने अभिवादन

नाशिक : अखिल भारतीय महाराष्ट्र सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष सागर जाधव, विश्वास जाधव, युवराज शेगावकर, राहुल तुपलोंढे, प्रशांत जाधव, मनोहर दोंदे, उत्तम जाधव आदी उपस्थित होते.

जीएसटी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर कार्यालयात महानिर्वानदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत गांगुर्डे राज्य कर उपायुक्त एम. ए. भगत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश अहेर यांनी केले. सूत्रसंचालन डी. एस. गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमास सर्व कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

भीमशक्ती सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन

नाशिक : भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास हेमलता पाटील, वैशाली भोसले, अविनाश आहेर, गं. पा. माने आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम ठाकूर यांनी, तर सूत्रसंचालन रेखा शेलार यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील नागरिकांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Award to Shirish Kulkarni