स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:18 IST2018-02-22T00:06:34+5:302018-02-22T00:18:51+5:30
लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी व अशोका रियालिटी आयोजित लायन्स फेस्टिव्हल २०१८ अंतर्गत मिस, मिसेस, मिस्टर व लिटल मास्टर सिन्नर २०१८ स्पर्धा उत्साहात पार पडली.

स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
सिन्नर : लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी व अशोका रियालिटी आयोजित लायन्स फेस्टिव्हल २०१८ अंतर्गत मिस, मिसेस, मिस्टर व लिटल मास्टर सिन्नर २०१८ स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेतील विजेते मिस सिन्नर, मिस्टर सिन्नर आणि मास्टर सिन्नर यांना मराठी मालिकेतील घाडगे अॅण्ड सून फेम अक्षय अर्थात चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. चिन्मय उदगीरकर यांनी सिन्नरकरांचे कौतुक करीत प्रेक्षकांशी मनमुराद गप्पा मारल्या. भविष्यकाळात या व्यासपीठामुळे नवीन कलाकार निर्माण होताना पहायला मिळतील. आपले शिक्षण केटीएचएम या महाविद्यालयात झाल्याचे ते म्हणाले. अभिनयाच्या ध्यासामुळे मला हे शिखर गाठता आल्याचे उदगीरकर यांनी सांगितले. चिन्मय उदगीर यांचे स्वागत व सत्कार डी. एस. गडाख यांनी केला. यावेळी हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, गोविंद माळवे, सुनील माळवे, संजय सानप, हेमंत नाईक तसेच सर्व लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. अपर्णा क्षत्रिय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. परीक्षक म्हणून उदय देवनपल्ली व शशांक इखनकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील विजेते
लायन्स क्लब मिस सिन्नर- ऋतुजा खुस्तुले, उपविजेती- तपस्वी तुपे, लायन्स मिसेस सिन्नर- त्रिलोक झा, उपविजेता- १) अदित्य कट्यारे, २) रंजना कट्यारे, लिटल मास्टर- आर्यभट्ट, उपविजेता- १) आर्यन चव्हाण, २) सम्राज्ञ काळे. लिटल मास्टर मुली- आकांक्षा दंडगव्हाळ, उपविजेता- दिव्या आव्हाड.