शाह विद्यालयात पारितोषिक वितरण

By Admin | Updated: July 26, 2014 00:49 IST2014-07-25T23:04:41+5:302014-07-26T00:49:01+5:30

शाह विद्यालयात पारितोषिक वितरण

Award distribution in Shah Vidyalaya | शाह विद्यालयात पारितोषिक वितरण

शाह विद्यालयात पारितोषिक वितरण

मालेगाव : संगमेश्वरातील श्री. र. वी. शाह विद्यालयात श्रीमती कांताबेन रतिलाल शाह गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र शाह होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप शाह, सुनयनाबेन शाह, ऋषभ शाह उपस्थित होते.
या कार्यक्रमात स्मृती सुरेश पाटील (विद्यालयात प्रथम तसेच मराठी, गणित, भूमिती, समाजशास्त्र या विषयात प्रथम), पूजा आबा सैंदाणे (हिंदी-संस्कृत), सुरभी दिलीप शिरुडे (संस्कृत), मोनाली ज्ञानेश्वर सोनवणे (विज्ञान), लब्धी पीयूष शाह (इंग्रजी), कल्याणी संजय शेवाळे, निकिता नानाजी पवार, कल्याणी सुभाष चौधरी, विशाखा सुधीर अहिरे (समाजशास्त्र विषयात प्रथम) या विद्यार्थिनींना गौरवण्यात आले. ललित तिळवणकर यांनी प्रास्ताविक केले. इयत्ता दहावीत राज्य विभाग व जिल्हात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे प्रताप शाह यांनी जाहीर केले. तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Award distribution in Shah Vidyalaya