संकल्प बहुद्देशीय संस्थेतर्फे पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:04 IST2020-02-07T22:35:44+5:302020-02-08T00:04:23+5:30

संकल्प बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सत्यरत्न विशेष पुरस्कार, यशवंत गौरव पुरस्कार, निर्मल सेवा पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

Award Distribution by Resolve Multipurpose Organization | संकल्प बहुद्देशीय संस्थेतर्फे पुरस्कार वितरण

निफाड येथील संकल्प बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्याप्रसंगी सन्मानार्थींसमवेत वि. दा. व्यवहारे, शिवाजी ढेपले, राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, संजय आहेर, मधुकर शेलार, बापू कुंदे, नंदलाल बाफना, प्रकाश सुराणा, सुनील निकाळे, सुहास सुरळीकर आदी.

निफाड : येथील संकल्प बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सत्यरत्न विशेष पुरस्कार, यशवंत गौरव पुरस्कार, निर्मल सेवा पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढेपले, लासलगाव बाजार समितीचे संचालक सुभाष कराड, संजय आहेर, नगरसेवक राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, मधुकर शेलार, शशांक सोनी, राजेंद्र मोगल, नंदलाल बाफना उपस्थित होते.
रोपाला पाणी घालून सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी ज्ञानेश्वर निकरट, आनंद गोसकी, कविता पगार, सागर भावसार, कैलास खापरे, डॉ. नारायण लोखंडे, सुभाष खैरनार, शिल्पा भामरे, ज्ञानेश्वर पायमोडे, प्रा. डॉ. संतोष वाघ, संदीप कुयटे, प्रा. सीमा सोनवणे यांच्यासह जनार्दन अनाथाश्रम (लासलगाव), सिम्मी डिझायनर्स (नाशिक) या संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चारु शीला कर्डिले, जावेद शेख, देवदत्त कापसे, दिलीप कापसे, संपत कराड, मधुकर राऊत, बापूसाहेब कुंदे, एन.डी. केदार, सुनील निकाळे, सागर कुंदे, तन्वीर राजे, किसन कुंदे, रमेश जाधव, सुनील जाधव, विक्रम रंधवे, रफिक शेख, जानकीराम धाराराव आदी उपस्थित होते.

Web Title: Award Distribution by Resolve Multipurpose Organization