देवळालीत स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:49+5:302021-02-05T05:40:49+5:30
‘स्वच्छ देवळाली, सुंदर देवळाली व हरित देवळाली’ असे ब्रीद मिरवणाऱ्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये गेल्या वर्षीच्या ...

देवळालीत स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रबोधन
‘स्वच्छ देवळाली, सुंदर देवळाली व हरित देवळाली’ असे ब्रीद मिरवणाऱ्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने चांगलीच पिछाडी झाली आहे. मागील महिन्यात झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात कॅन्टोन्मेंट बोर्डाचा १३ नंबरने मागे जात स्वच्छता सर्वेक्षणात असलेल्या ६२ कॅन्टोन्मेंटपैकी देवळाली कॅन्टोन्मेंट ५२ व्या स्थानी घसरण झाली. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पुन्हा स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये देखील सहभाग नोंदविला असून अधिकाधिक नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता शहरातील गजबज असलेल्या प्रमुख रस्त्यांवर ओला-सुका कचरा वेगळा करा, आपल्या परिसराची स्वच्छता कशी ठेवावी, स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग असावा असे विविध संदेश या भिंतीवर साकार करण्यात आले असल्याचे रंगरंगोटीतून दिसून येत आहे. (फोटो २८ देवळाली)