कलापथकाकडून प्रबोधन
By Admin | Updated: October 25, 2016 00:21 IST2016-10-25T00:19:43+5:302016-10-25T00:21:00+5:30
शिंगवे : जय शिव मल्हारच्या कलावंतांचा उपक्रम

कलापथकाकडून प्रबोधन
सायखेडा : निफाड तालुक्यातील शिंगवे येथील सामाजिक विकास मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने समाजप्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते होते. सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिंगवे येथील जय शिव मल्हार वाघे मंडळ लोककला पथकाने सादर केलेल्या प्रबोधन गीतांना उपस्थितीतांनी मन:पूर्वक दाद दिली. पथकातील कलाकार चंद्रभान रायते, विठोबा ड़ेर्ले, बाबूराव कटारे, किसन कमानकर, देवराम कटारे, रामकृष्ण सानप, दौलत सातपुते, वसंत गायकवाड यांनी गायलेल्या बेटी बचाव, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी आदि विषयांवरील सामाजिक प्रबोधन गीतांना गायनाने शिंगवेकर मंत्रमुग्ध
झाले. ग्रामस्थांतर्फे कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक विकास मंचचे पदाधिकारी व शिंगवे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)