शासकीय कामात हलगर्जीपणा टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:32 IST2020-01-23T22:45:53+5:302020-01-24T00:32:29+5:30
निफाड तालुक्यातील रेंगाळलेली विकास कामे मार्गी लावण्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच नागरिकांना तत्काळ सेवा देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असायला हवे, अशा स हब्दात आमदार दिलीप बनकर यांनी अधिकार्यांना सुनावले.

शासकीय कामात हलगर्जीपणा टाळा
पिंपळगाव : निफाड तालुक्यातील रेंगाळलेली विकास कामे मार्गी लावण्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच नागरिकांना तत्काळ सेवा देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असायला हवे, अशा स हब्दात आमदार दिलीप बनकर यांनी अधिकार्यांना सुनावले.
तालुक्यातील विविध विकासकामांचा आड्हावा घेण्यासाठी सर्व विभागांच्या प्रमुखांच्या बैठकीत आमदार बनकर बोलत होते. या बैठकीत तालुक्यातील ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्य धंदे सुरु आहे ते तत्काळ बंद व्हावे, सायखेडा पोलीस स्टेशन इमारत बांधकाम प्रस्ताव, पोलीस वसाहत, तालुक्यामध्ये 2 पोलीस उपविभागीय कार्यालय असून ते एकत्रकरून एकच उपविभागीय कार्यालय बांधणे, पोलीस स्टेशन आऊट पोस्ट निर्माण करून कर्मचारी नियुक्त करणे, तालुका कृषी विभागातर्फे राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती पोहचविणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहायक निबंधक अभिजित देशपांडे, तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते. शेततळे, कांदाचाळ अनुदान, टॅक्टर खरेदी अनुदान, शेती औजारे आकारण्यात येणार जीएसटी या संबंधित माहिती, तालुक्यातील विजेची समस्या, घरकुल योजना, स्वच्छ भारत अभियान, निधीचा वापर करावाआदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच रखडएली कामे संबंधित वुभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना बनकर यांनी दिल्या.