औषधांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम टाळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:29 IST2017-09-26T23:35:42+5:302017-09-27T00:29:01+5:30
फार्मसी कायदा व कॉस्मेटिक अंमल बजावणी आपल्या देशात प्रभावीपणे केल्यास रु ग्णावर होणारा अतिरिक्त औषधांचा अतिरेक व त्यामुळे होणारे दुष्परिणाम यापासून रु ग्णांची होणारे आर्थिक व शारीरिक नुकसानपासून सुटका होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

औषधांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम टाळावे
नाशिक : फार्मसी कायदा व कॉस्मेटिक अंमल बजावणी आपल्या देशात प्रभावीपणे केल्यास रु ग्णावर होणारा अतिरिक्त औषधांचा अतिरेक व त्यामुळे होणारे दुष्परिणाम यापासून रु ग्णांची होणारे आर्थिक व शारीरिक नुकसानपासून सुटका होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. जागतिक फार्मसी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.२६) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब सभागृहात सामाजिक बांधीलकी म्हणून अवयव दान शिबिर नोंदणी करणे, रक्तदान शिबिर, रक्ताच्या विविध तपासण्या, नेत्रतपासणी व नेत्रदान नोंदणी करणे या कार्यक्र मांचे आयोजन केले होते. त्यावेळी महेश झगडे बोलत होते. महेश झडगे यांनी औषध निर्माण अधिकारी संघटनेच्या कार्याचा गौरव करीत कायद्याचे कडक पालन करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी सांगितले कि.मी. शिक्षणाने फार्मसी पदवीधर असून, माझा सन्मान हा माझ्या औषध निर्माण शास्त्रातील कुटुंबीयांकडून झालेला सन्मान आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आपण गत काही वर्षांपासून फार्मसी महाविद्यालयात अध्यपन करत असून, माझे विद्यार्थी या सभागृहात शासकीय सेवेतील औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असल्याबद्दल विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष नयना रमेश गावित, शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पगार, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा रत्नाकर पवार, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा वामन खोसकर, समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, आरोग्य उपसंचालक डॉ. लोचना घोडके, अनिल लांडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ.सुशील वाघचौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अविनाश देशमुख, कार्याध्यक्ष विजय देवरे, दशरथ वाणी, सचिन अत्रे, हेमंत राजभोज, माधवी पाटील, जनार्दन सानप, तुषार पगारे, शिवाजी मुसळे, अजित गायकवाड मधुकर आढाव, शोभा खैरनार, विजयकुमार हळदे उपस्थित होते. प्रास्ताविक औषध निर्माण अधिकारी जी. पी. खैरनार यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती क्षेमकल्याणी यांनी केले. उपस्थितांचे आभार सोनाली तुसे यांनी मानले.