इगतपुरीत आतापर्यंत सरासरीच्या १४५ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:59 IST2019-09-09T14:59:35+5:302019-09-09T14:59:54+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील विविध धरणांच्या परिसरात आणि तालुकाभरात पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

इगतपुरीत आतापर्यंत सरासरीच्या १४५ टक्के पाऊस
घोटी : इगतपुरी तालुक्यातील विविध धरणांच्या परिसरात आणि तालुकाभरात पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आज दिवसभरात ६५ मिमी पावसाची नोंद झाली तर आतापर्यंत ४८२५ मिमि विक्र मी पाऊस नोंदवला गेला आहे. वार्षिक सरासरीच्या १४५.०८ टक्के पडलेल्या पावसाने तालुक्यातील धरणे, नद्या, नाले भरभरून वाहू लागले आहेत. ग्रामसेवक आणि जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तालुक्यातील कामकाज विस्कळीत झाले असतांनाच पावसामुळे यात भर पडली आहे. सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाºया वैतरणा धरणातून १०,३०० क्युसेसने तर मुकणेतुन ८७१, दारणा धरणामधुन ७४०८ तर भावली धरणातून ४८२ क्यूसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे अतिशय महत्वाचे धरण असलेले अप्पर वैतरणा धरण आणि मुकणे धरण यावर्षी मुसळधार पावसामुळे पुर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासुन संततधार पुन्हा सुरू झाल्याने धरणामधुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान संततधारेमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.