महिंद्रच्या कामगारांना सरासरी ५० हजारांचा बोनस

By Admin | Updated: October 9, 2014 01:11 IST2014-10-09T00:53:29+5:302014-10-09T01:11:57+5:30

महिंद्रच्या कामगारांना सरासरी ५० हजारांचा बोनस

Average bonus of 50 thousand for Mahindra workers | महिंद्रच्या कामगारांना सरासरी ५० हजारांचा बोनस

महिंद्रच्या कामगारांना सरासरी ५० हजारांचा बोनस


सातपूर : येथील महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीतील कामगारांना देण्यात येणाऱ्या बोनसबाबत मुंबईला युनियन पदाधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात सकारात्मक बोलणी झाली. त्यानुसार कामगारांना ७0 हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार असून, सरासरी ५० हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे.
सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील लहान-मोठ्या कारखान्यांमध्ये बोनसचे करार होत आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीतील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनी व्यवस्थापन आणि युनियन पदाधिकारी यांच्यात मुंबईला बोनसविषयी चर्चा झाली. या चर्चेत कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी कारला, विजय नायर, शेनॉय, बाळा पाटील तसेच युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण, सरचिटणीस सोपान शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, परशुराम कानकेकर, लॉरेन्स भंडारे, ज्ञानेश्वर पाटील, भुवनेश्वर पोई, सुनील औसरकर आदि सहभागी झाले होते.
चर्चेत झालेल्या बोलणीनुसार आज बोनसची घोषणा करण्यात आली. कमीत कमी १४ हजार व जास्तीत जास्त ७0 हजार म्हणजे सरासरी ५२ ते ५६ हजार रुपये बोनस मिळणार आहे. अपेक्षेप्रमाणे बोनस मिळाल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)

Web Title: Average bonus of 50 thousand for Mahindra workers