अवनखेडचा पुल वाहनांसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 14:48 IST2020-08-06T14:47:45+5:302020-08-06T14:48:40+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीवरील पुल प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी हजर झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

अवनखेडचा पुल वाहनांसाठी खुला
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीवरील पुल प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी हजर झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
अवनखेडचा कादवा नदीवरील पुल म्हणजे प्रत्येकाच्या मनात धडकी भरविणारा बस अपघात. या अपघाताने हा पुल उभ्या महाराष्ट्रात गाजला होता.तेव्हा पासूनची मागणी होती. या पुलाशेजारी नवीन पुल तयार करावा. त्याप्रमाणे जुन्या पुलाजवळ नवीन ऊंच पुल तयार करण्यात आला .परंतु या नवीन पुलाच्या उदघाटनाला अनेक आजी माजी नेत्यांनी उदघाटन झाले. परंतु काही दिवस या पुलावरून वाहानाची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू झाली. या नवीन पुलावर मोठ मोठे खड्डे पडल्याने हा नवीन पुल वाहनधारकांची डोकेदुखी ठरला होता. त्यामुळे या नवीन पुलावर अनेक छोटे मोठे अपघात होण्यास सुरु वात झाली.या कारणानी पुल बंद केला होता. यामुळे या पुलाला दुरूस्ती करण्याची परत एकदा मोहिमेला सुरु वात केली. ते दुरु स्तीचे काम जवळ जवळ ९ ते १० महिने चालले. त्यामुळे शासनाने परत एकदा या पुलाकडे लक्ष देऊन पुल नव्याने तयार झाल्याने बळीराजांच्या अनेक समस्या यामुळे मार्गी लागल्याने परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे. आता योग्य काम झाल्याने हा पुल प्रवासी वर्गासाठी आता खुला केल्याने सर्वच वाहनधारकांनी मोकळा श्वास घेतला आहे.