कावळे विद्यालयात ‘लेखक तुमच्या भेटीला’
By Admin | Updated: February 3, 2016 22:08 IST2016-02-03T22:07:02+5:302016-02-03T22:08:35+5:30
कावळे विद्यालयात ‘लेखक तुमच्या भेटीला’

कावळे विद्यालयात ‘लेखक तुमच्या भेटीला’
दिंडोरी : आपली संस्कृती दोन हजार वर्षे जुनी आहे. भाषेतील प्रतिमा, प्रतीके मनात घर करून असतात. कोणत्याही भाषेची गुणवत्ता, समद्धी ही तिच्या साठ्यावर अवलंबून राहते. जीवनाचे सारे तत्त्वज्ञान आपल्या मातृभाषेतून आपल्याला मिळत असते. ज्ञान समजून घेताना भाषा मदतीला येते. कारण ज्ञानाच्या वाहनाचा मार्ग मातृभाषेतून जातो. असे विचार संगमनेर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी मांडले.
ते पुढे म्हणाले की, मराठी भाषा विज्ञानाच्या अंगाने फारशी प्रगत नाही. म्हणून इंग्रजीत शिकावे लागते. तरुणांनी या वर जाणीवपूर्वक काम केले पाहिजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्र मांतर्गत कादवा साखर कारखाना कार्यस्थळावरील बी. के. कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. आरंभी विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांनी शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा. नीलिमा जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. रघुवीर पाटसकर यांनी आभार मानले. ज्युनि. कॉलेज प्रमुख प्रा. नानासाहेब बोरसे, प्रा. बाळासाहेब वडजे, प्रा.विष्णू वक्टे, प्रा. रतन आवारे आदिंसह विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. (वार्ताहर)