ओसाड माळरानावर पिकवली आॅस्ट्रेलियन थायलेमनची शेती
By Admin | Updated: August 20, 2016 00:13 IST2016-08-20T00:11:56+5:302016-08-20T00:13:04+5:30
प्रयोगशील : इगतपुरी तालुक्यातील निनावीच्या युवकाच्या मेहनतीला फळ

ओसाड माळरानावर पिकवली आॅस्ट्रेलियन थायलेमनची शेती
लक्ष्मण सोनवणे बेलगाव कुऱ्हे
अनेक बेरोजगार युवकांना रोजगार नसल्यामुळे भटकंती करावी
लागते. शेती व्यवसायातदेखील खूप समस्या निर्माण झाल्याने मोठ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे युवक शेतीकडे कधीही ढुंकूनही बघत नाहीत; मात्र पारंपरिक शेती व्यवसायाला प्रचंड मेहनतीची जोड देत काही जिगरबाज
युवक उदासीन न होता नवीन प्रयोगांच्या शोधात ओसाड माळरानावरदेखील यशस्वी शेती करून दाखवितात.
इगतपुरी तालुक्यातील निनावी येथील परेश देशमुख या २५ वर्षीय युवकाने ओसाड माळरानावर सेंद्रिय शेतीचा अवलंब करीत आॅस्ट्रेलियन थायलेमनची (लिंबू) विदेशी शेती यशस्वी केली आहे. तालुक्यात हा पहिलाच प्रयोग असल्याने त्याचा नवीन प्रयोग पाहण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर येथून अनेक शेतकरी येत असतात व त्यांचे कौतुक करतात.