मालेगावी चित्रपटगृहांना प्रेक्षकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 16:09 IST2020-12-27T16:07:36+5:302020-12-27T16:09:10+5:30
मालेगाव कँँम्प : मालेगावी सिनेरसिंकासाठी चित्रपट गृहे सूरु झाले परंतु त्यास हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने चित्रपट गृह मालक काहीसे हतबल झाले आहेत.

मालेगावी चित्रपटगृहांना प्रेक्षकांची प्रतीक्षा
मालेगाव शहर सिने रसिकांमुळे प्रसिद्ध आहे. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी शर्तीसह चित्रपट गृहे सूरु झाले. शहरात सुमारे पंधरा चित्रपट गृहे आहेत. यातील पाच सहा गृहे विविध प्रकारच्या कारणांमुळे कायमची बंद झाली आहे. लॉकडाऊन नंतरच्या नवीन नियमानुसार सर्व चित्रपट गृह सूरु होणे सिनेरसिंकाना अपेक्षित होते पण त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या. शहरातील मोजके चार पाच सिनेमा गृहे सूरु झाली आहेत तर उर्वरित पाच सहा सिनेमागृह अद्यापही बंद आहेत. जे सुरु आहे त्यामध्ये आवडते सिनेमे लागले नसल्याने प्रेक्षकांनी तिकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांंनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या सहा सात महिने सिनेमागृहे बंद होती. कर्मचारी वर्गाला घरातूनच वेतन द्यावे लागले. पुन्हा सिनेमा गृहे सुरु झाल्यानंतर परिस्थिती बदलली जाईल अशी अपेक्षा फोल ठरली. या परीस्थितीत बदल होण्याची प्रतिक्षा चित्रपटगृह चालकांमध्ये आहे.