येवला : येथील कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य आवार व अंदरसुल उपबाजार आवरावर सोमवार (दि.२४) पासून शेतमाल लिलाव पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती मुख्य प्रशासक वसंत पवार यांनी दिली.जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील सूचनेप्रमाणे कोरोना काळात बाजार समितीचे लिलाव कामकाज पूर्ववत सुरू करणेसाठी सोमवारी (दि.२४) मुख्य आवार येवला येथे ५०० (ट्रॅक्टर) व उपबाजार अंदरसुल येथे ३०० (ट्रॅक्टर) कांदा लिलावासाठी ( फक्त ट्रॅक्टर) वाहनांची नोंदणी रविवार (दि.२३) मुख्य आवारासाठी तसेच उप बाजार अंदरसुलसाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. मोबाईलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच सोमवारी (दि. २४) बाजार समितीत प्रवेश दिला जाईल असे मुख्य प्रशासक पवार, सचिव कैलास व्यापारे व प्रशासकीय मंडळ सदस्यांनी कळविले आहे.
येवला बाजार समितीत उद्यापासून लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:00 IST
येवला : येथील कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य आवार व अंदरसुल उपबाजार आवरावर सोमवार (दि.२४) पासून शेतमाल लिलाव पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती मुख्य प्रशासक वसंत पवार यांनी दिली.
येवला बाजार समितीत उद्यापासून लिलाव
ठळक मुद्देशेतमाल विक्रीस आणताना कोरोना चाचणी बंधनकारक