वाळू माफियांच्या वाहनांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:25 IST2021-03-04T04:25:53+5:302021-03-04T04:25:53+5:30
अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांना तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी रंगेहाथ पकडले होते. दंड भरण्यासाठी वेळोवेळी ...

वाळू माफियांच्या वाहनांचा लिलाव
अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांना तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी रंगेहाथ पकडले होते. दंड भरण्यासाठी वेळोवेळी नोटीस बजावूनही रक्कम न भरल्याने तहसीलदार इंगळे पाटील यांनी आता जप्त केलेले तीन ट्रक्स लिलावात काढले आहेत. ९ लाख ४५ हजार ५०० रुपये दंड वसुलीसाठी येत्या ८ मार्चला या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असून वाहनधारक अजय झाल्टे (रा. नाशिक) यांना ४ लाख ४ हजार ७५० रुपये, विजय नवल सरस (रा. साक्री, जि. धुळे) २ लाख ९४ हजार ५०० रुपये, केतन ताराचंद भावसार (रा. पाटणे, मालेगाव) यांना २ लाख ४७ हजार २५० रुपये दंड आकारला आहे.