दिव्यांग विद्यार्थ्यांनी रंगवल्या आकर्षक पणत्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 16:41 IST2020-10-27T16:39:01+5:302020-10-27T16:41:14+5:30
पेठ -पंचायत समिती अपंग समावेशीत शिक्षण गटसाधन केंद्र यांचे वतीने तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी पणती रंगवणे कार्यशाळा संपन्न झाली.

पेठ येथे दिव्यांग विद्यार्थी पणत्या रंगवणे कार्यशाळेप्रसंगी उपस्थित विलास अलबाड, महेश टोपले, सुरेश पवार, विशाल जाधव, पद्माकर कामडी, सुनिता जाधव, वसंत खैरणार, प्रशांत जाधव, भारती कळंबे आदी.
पेठ -पंचायत समिती अपंग समावेशीत शिक्षण गटसाधन केंद्र यांचे वतीने तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी पणती रंगवणे कार्यशाळा संपन्न झाली.
सभापती विलास अलबाड यांचे हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती महेश टोपले, विशाल जाधव, पद्माकर कामडी, सुरेश पवार, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनिता जाधव, विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, वसंत खैरणार, भारती कळंबे, रामदास शिंदे , गोपीचंद भामरे, सतिश ओतारी, विलास आरज आदी उपस्थित होते.
यावेळी विशेष शिक्षक विषयतज्ञ हेमंत भोये,सुनंदा सोनार, विशेष शिक्षिका लीना महाले, पूनम साळुंखे, नितिन पठाडे, किरण मेढे यांनी दिव्यांग विद्यार्थांकडून विविध प्रकारच्या पणत्या रंगवण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. विशेष म्हणजे पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांनीच सदरच्या पणत्या खरेदी केल्याने दिव्यांग विद्यार्थ्याचा उत्साह वाढल्याचे दिसून आले.