नाशिक-वृद्धाश्रम म्हटले की आजही मन उदास होते. जन्मदात्यांना सांभाळायलाही मुलांना वेळ नाही का? असा प्रश्न पडतो. पण विविध कारणांमुळे वृद्धाश्रमात रहावे लागणारे वृद्ध आपले दैनंदिन जीवन आनंदात, मजेत आणि कृतीशिल निर्मीतीत व्यतीत करत असतील तर त्याहून आनंदाची गोष्टच असू शकत नाही. असाच काहीसा विचार करुन जवळ येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी आपल्या हातांनी आकर्षक गणेशमुर्ती साकार करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का देण्याचे काम केले आहे येथील वात्सल्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी. विविध वयोगटातील या ज्येष्ठ नागरिकांनी स्रेहा शिंदे, श्रद्धा शिंदे, सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणस्रेही शाडू मातीपासून गणपती बनविले आहे.आश्रमातील २० आजी आजोबांनी आपल्या हाताने, आपल्या कल्पनाशक्तीला संपुर्ण वाव देत आकर्षक गणराय साकारले आहेत. लहानमोठ्या आकाराचे, निरनिराळ्या नक्षीचे गणराय त्यांनी साकारले आहेत. वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सतीश सोनार, सचिव जय बडगुजर, स्वामी निस्पृहस्पंदन महाराज, कर्मचारी यांनी यासाठी आजीआजोबांना प्रोत्साहन देत त्यांच्यातल्या कलेला दाद दिली. आता भविष्यात आणखी सराव करून आकर्षक मूर्ती तयार करून आपला बाप्पा आपणच साकारण्याचा निश्चय यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्यांनी तयार केलेल्या प्रत्येक गणपतीमूर्तीत आपल्या कल्पनाशक्तीचा आविष्कार दिसून येत होता. आकार, रंग यांचा अभिनवपद्धतीने वापर केला जात होता. पर्यावरणपूरक साहित्याने गणपतीची सजावटही केली.
...अन वृद्धांनी साकारल्या आकर्षक गणेशमुर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:11 IST
पर्यावरणस्रेही शाडू मातीपासून गणपती बनविले
...अन वृद्धांनी साकारल्या आकर्षक गणेशमुर्ती
ठळक मुद्देपर्यावरणस्रेही शाडू मातीपासून गणपती बनविले