साईपालखी शोभायात्रेने वेधले लक्ष
By Admin | Updated: April 30, 2017 02:05 IST2017-04-30T02:05:06+5:302017-04-30T02:05:20+5:30
सिडको : जुने सिडको परिसरातील साईनाथ मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर साईपालखी आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

साईपालखी शोभायात्रेने वेधले लक्ष
सिडको : जुने सिडको परिसरातील साईनाथ मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर साईपालखी आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांचे लेजीम पथक, कथकली नृत्याविष्कार, विघ्नहरण ढोल पथकाचे ढोलवादन यांसह पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला आणि एलईडी लाइट््सने सजविलेली साई बाबांची पालखी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. जुने सिडको परिसरातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी रांगोळी काढून शोभायत्रेचे स्वागत करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले.
यानिमित्त अन्नदान आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले. रविवारी (दि. ३०) सर्वरोगनिदान वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, वैद्यकीय तपासणीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या मिरवणुकीमार्गात डोरेमॉन, डायनासोर, मिकी माउसच्या वेशभूषेतील प्रतीकात्मक कार्टुन्सने लहान मुलांची विशेष करमणूक केली. या मिरवणुकीत ओम साईनाथ ट्रस्टचे अध्यक्ष नगरसेवक प्रवीण तिदमे, किरण भांबेरे, विक्रम काळे, नगरसेवक श्याम साबळे, सुनील निकुंभ, विवेक संघवी, आकाश शिंदे, राजेंद्र मोहिते, शरद फडोळ, विजय लहामगे आदिंनी सहभाग नोंदवला होता.