‘पर्यावरण चक्र’ ठरले आकर्षण : ‘एक्सक्लेम’ प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:43 IST2019-03-25T00:43:15+5:302019-03-25T00:43:32+5:30
मानवी अतिरेकामुळे बिघडत चाललेल्या नैसर्गिक चक्राचा अनुभव आता मानवाला येऊ लागला आहे. त्यामुळे हे बिघडलेले नैसर्गिक चक्र विनाश चक्र ठरू लागले आहे.

‘पर्यावरण चक्र’ ठरले आकर्षण : ‘एक्सक्लेम’ प्रदर्शन
नाशिक : मानवी अतिरेकामुळे बिघडत चाललेल्या नैसर्गिक चक्राचा अनुभव आता मानवाला येऊ लागला आहे. त्यामुळे हे बिघडलेले नैसर्गिक चक्र विनाश चक्र ठरू लागले आहे. या चक्राला भेदून त्याचा समतोल साधण्यासाठी मानवाला आवश्यक ती पावले उचलावी लागणार आहेत, याकडे आयडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण चक्र’ची प्रतिकृती सादर करत लक्ष वेधले. विद्यावर्धन ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन इन्व्हायर्मेंट (आयडिया) महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘एक्सक्लेम’ हे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकात भरविण्यात आले आहे.
पर्यावरणचक्र प्रतिकृतीचे आकर्षण
प्रदर्शनात महाविद्यालयाचे विद्यार्थी यकीन अजय किनगर, यश सेठी, स्टीफन, फर्नांडिस, विग्नेश गोपीनाथ, मयूर देवरे यांनी राष्टÑीय पारितोषिक प्राप्त ‘पर्यावरण चक्र’ची प्रतिकृती सादर केली. ही प्रतिकृती प्रदर्शनाची आकर्षण ठरली. या प्रतिकृतीत पहिले चक्र अग्नी, दुसरे चक्र जल, तिसरे पृथ्वी, चौथे वायू आणि पाचवे आकाश दर्शविते. ही सर्व चक्रे क्रमाने ३६० अंशांत संयोग होऊन फिरतात आणि अठराशे संयोग तयार होऊन अर्थ बदलतो. ध्वनिप्रदूषण, वायू प्रदूषणाची जाणीव करून देते.