सुशिक्षित तरुणांची ओढ शेतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:03 IST2020-06-23T22:02:01+5:302020-06-23T22:03:20+5:30
कवडदरा : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार हाताला कामधंदा नसल्याने शेती व्यवसायाकडे वळला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शहरातील कंपन्या, मोठे उद्योग समूह बंद आहेत. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, पिंपळगाव डुकरा परिसरातील सुशिक्षित बेरोजगार शेती व्यवसाय करताना दिसत आहेत.

कवडदरा परिसरातील शेतशिवारात शेतीची कामे करताना बेरोजगार तरुण.
कवडदरा : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार हाताला कामधंदा नसल्याने शेती व्यवसायाकडे वळला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शहरातील कंपन्या, मोठे उद्योग समूह बंद आहेत. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, पिंपळगाव डुकरा परिसरातील सुशिक्षित बेरोजगार शेती व्यवसाय करताना दिसत आहेत.
शेत शिवारामध्ये बागायत क्षेत्रात शेतीची कामे करताना सुशिक्षित बेरोजगार तरुण दिसत आहेत. शेती शाश्वत उत्पन्न देणारे साधन नसल्यामुळे शासनाने शेतीवर आधारित उद्योगधंद्याना प्राधान्य द्यावे तसेच सुशिक्षित बेरोजगारांना शेतीवर आधारित उद्योगधंद्यासाठी विशेष सवलत द्यावी, अशी मागणी बेरोजगार तरु णांकडून करण्यात येत आहे.