शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

मालेगावी खड्ड्यांत वृक्षारोपण करत वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:57 PM

मालेगाव : तालुक्यातील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचे त्याकडे लक्ष वेधले जावे, यासाठी बुधवारी (दि.१६) परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील माळमाथा भागातील रस्त्यांची दुरवस्था

मालेगाव : तालुक्यातील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचे त्याकडे लक्ष वेधले जावे, यासाठी बुधवारी (दि.१६) परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तालुक्यातील माळमाथा भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था झाली आहे. वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत. मालेगावी रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य पद्धतीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यावेळी प्रा. हिरालाल नरवाडे, बापू भामरे, समाधान पवार, शिवाजी नजन यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य विष्णू जाधव, शिवदास हिरे, शिवाजी नजन, गोरख भवर, गोकुळ भवर, विजय वाघ, प्रकाश दातीर, कैलास देवरे, बापू भामरे, सीताराम आचट, सागर भवर, खुशाल सूर्यवंशी, मोटू शेवाळे, योगेश शेवाळे आदी सहभागी झाले होते.ग्रामपंचायती करणार ठरावलोकप्रतिनिधींनीही रस्ता दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्याचे काम त्वरित व्हावे, या मागणीसाठी परिसरातील ग्रामपंचायतींनी सामूहिक ठराव करून ठराव शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे.माळमाथा परिसरातील रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला तोंड द्यावे लागते. शासन- प्रशासनाने त्वरित या रस्त्यांची दुरुस्ती करावी.-प्रा. हिरालाल नरवाडे, ग्रा.पं. सदस्य, बोधे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMalegaonमालेगांव