इंदिरानगर परिसरात २५ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:07+5:302021-02-05T05:41:07+5:30
इंदिरानगर : पहिल्याच दिवशी परिसरातील शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र, काेरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ...

इंदिरानगर परिसरात २५ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी
इंदिरानगर : पहिल्याच दिवशी परिसरातील शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र, काेरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळांकडून नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. इंदिरानगर परिसरातील पाचवी ते आठवीच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात आले होते. परंतु, बहुतेक शाळेत २५ टक्केच विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याचे दिसून आले. सुखदेव प्राथमिक विद्यालयात सकाळी दहा वाजता शाळा भरविण्यात आली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासून तसेच हात स्वच्छ धुवून शाळेत प्रवेश देण्यात आला. राणेनगर येथील जाजू विद्यालयात बारा वाजता शाळा भरविण्यात आली. तत्पूर्वी टप्पाटप्प्याने इयत्तानिहाय विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यात आले. स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापक विमल काकड यांनी स्वागत केले.