नाशिकच्या गोदावरीत आंदोलनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:12 IST2018-07-25T01:12:07+5:302018-07-25T01:12:21+5:30

औरंगाबादच्या गंगापूर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. या घटनेनंतर नाशिकमध्येही विलास कदम या तरुणाने गोदावरीच्या प्रवाहात उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

 Attempts at the movement of Nashik Godavari | नाशिकच्या गोदावरीत आंदोलनाचा प्रयत्न

नाशिकच्या गोदावरीत आंदोलनाचा प्रयत्न

नाशिक : औरंगाबादच्या गंगापूर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. या घटनेनंतर नाशिकमध्येही विलास कदम या तरुणाने गोदावरीच्या प्रवाहात उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. नाशिकरोड परिसरात दशकपंचक भागातील हा प्रकार लक्षात येताच मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी तत्काळ धाव घेऊन विलास कदम याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन त्याला पाण्याबाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. परंतु, आरक्षणासाठी आत्महत्येचे लोन महाराष्ट्रभर पसरत असल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Web Title:  Attempts at the movement of Nashik Godavari