Attempts to kill young man in Satpur | सातपूरमध्ये तरुणाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न
सातपूरमध्ये तरुणाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देसहायक पोलीस निरीक्षक मजगर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील ई-५१ परिसरातील फॅब्रिकेशन कंपनीसमोर तीन संशयित आरोपींनी कुरापत काढून गिरणारे येथील बालाजी मठ येथील रहिवासी तरुणावर प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा चुलत भाऊ संदीप पोटिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. संशयित सोमेश्वर कॉलनीतील तैयब खान (३०), जावेद खान (३२) व मझहर खान (३५) या तिघांनी प्रवीण पोटिंदे यांची शिवीगाळ कोणाला करत, अशी कुरापत काढून त्याला लोखंडी पट्टीने मारहाण करून जबर दुखापत केली. यावेळी चुलतभावाला वाचविण्यासाठी गेलेला फिर्यादी संदीप पोटिंदे यालाही हातावर चाकू मारून आरोपींनी जखमी केले, तर प्रवीणच्या डोक्याला व डोळ्याला चाकू मारून शिवराळ करून दमदाटीही केल्याची तक्रार संदीप पोटिंदे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक मजगर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Attempts to kill young man in Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.