गंगापूररोडवर खड्डे बुजविण्याचा प्रयत्न कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:24 IST2020-01-16T23:23:58+5:302020-01-17T01:24:19+5:30
पावसाळा उलटून तीन महिने झाले तरी अद्याप गंगापूररोड परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य असून, महापालिकेचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गंगापूर गाव परिसर, गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

गंगापूररोडवर खड्डे बुजविण्याचा प्रयत्न कुचकामी
गंगापूर : पावसाळा उलटून तीन महिने झाले तरी अद्याप गंगापूररोड परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य असून, महापालिकेचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गंगापूर गाव परिसर, गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
आकाशवाणी टॉवर ते चिंतामणी लॉन्स व तेथून पुढे चोपडा लॉन्स परिसरही खड्ड्यांनीच व्यापला आहे. या खड्ड्यांपासून वाहनधारकांची सुटका व्हावी, याकरिता तात्पुरती मलमपट्टीही करण्यात आली. अनेक ठिकाणी खडीचा चुरा टाकण्यात आला. विटांचे तुकडे टाकूनही खड्डे बुजविण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून करण्यात आला. परंतु, ही मलमपट्टी कुचकामी ठरत असून, पुन्हा या खड्ड्यांची अवस्था जैसे थे आहे. त्यामुळे या खड्ड्यांवर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी केली आहे. संभाजी चौक, सिबल हॉटेल, विसे मळा, कृषिनगर, एबीबी सर्कल, कृषिनगर ते शरणपूर पोलीस चौकी या परिसरातही वाहनधारकांना रस्त्यांवरील खड्डे चुकविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या परिस्थितीत दुचाकी व चारचाकी वाहनांसह रिक्षावाले या रस्त्याला अक्षरश: वैतागले आहेत. नागरिकांना चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच वाहने चालवावी लागत असून, त्यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.
खड्डेच खड्डे चोहीकडे अशी सध्या शहरातील बहुतांश रस्त्यांची स्थिती असून, या रस्त्यांची तत्काळ दुरु स्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून त्यांच्यावर वारंवार मलमपट्टी म्हणून हलक्या दर्जाच्या डांबराचे पट्टे मारण्यात आले आहे
गंगापूर रोडवर व रस्त्याच्या मधल्या बाजूला असलेल्या कॉलनी रस्त्यांवर तात्पुरते काम करून खड्डे बुजवले, मात्र काही दिवसातंच ते पुन्हा उखडल्याने रस्त्यांवर वाहन चालवणे अवघड झाले आहे.
- जयेश आगरकर, नागरिक