शाळकरी मुलांकडून शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:28 IST2021-02-18T00:26:52+5:302021-02-18T00:28:35+5:30
सिडको : पाथर्डी फाटा भागातील वर्दळीच्या ठिकाणी बुधवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाच शालेय विद्यार्थी दोन दुचाकींवरून जात होते. यावेळी एका दुचाकीने जाणाऱ्या दोघांनी दुसऱ्या दुचाकीने जाणाऱ्या तिघा शाळकरी मुलांना ओव्हरटेक करत पुढे जाऊन शस्त्र काढत हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या मुलांनी तेथून त्यांची गाडी सोडून पळ काढल्याने अनर्थ टळला.

शाळकरी मुलांकडून शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न
सिडको : पाथर्डी फाटा भागातील वर्दळीच्या ठिकाणी बुधवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाच शालेय विद्यार्थी दोन दुचाकींवरून जात होते. यावेळी एका दुचाकीने जाणाऱ्या दोघांनी दुसऱ्या दुचाकीने जाणाऱ्या तिघा शाळकरी मुलांना ओव्हरटेक करत पुढे जाऊन शस्त्र काढत हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या मुलांनी तेथून त्यांची गाडी सोडून पळ काढल्याने अनर्थ टळला.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा धारदार शस्त्राचा वापर करण्याचे प्रकार सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. पाथर्डी फाटा येथील एका पेट्रोल पंपासमोर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघा शाळकरी मुलांनी दुसऱ्या दुचाकीवरील शाळकरी मुलांना मारण्याच्या उद्देशाने शस्त्रे काढली; परंतु दुचाकीवरील मुलांनी दुचाकी सोडून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, असाच प्रकार सकाळी उत्तमनगर येथील महाविद्यालयात समोर घडला असून या घटनेतही एक युवक धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याचा प्रकार करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.