लॉकडाऊन काळात १३१ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:36 IST2020-09-05T16:35:11+5:302020-09-05T16:36:38+5:30
कळवण : एकीकडे जगात कोरोनाच्या संकटातून मार्ग काढत जीव वाचविण्याची धडपड सुरु असतांना दुसरीकडे नैराश्यासह विविध कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढल्याचे चित्र असून कळवण उपजिल्हा रु ग्णालयात गेल्या चार महिन्यांत आत्महत्येच्या प्रयत्न करणारे १३१ रु ग्ण दाखल होऊन त्यांचा जीव वाचविण्यात रु ग्णालयाला यश आले आहे. या रु ग्णांमध्ये कळवण, देवळा, सुरगाणा, बागलाण तालुक्यातील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचा समावेश आहे.

लॉकडाऊन काळात १३१ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
मनोज देवरे
कळवण : एकीकडे जगात कोरोनाच्या संकटातून मार्ग काढत जीव वाचविण्याची धडपड सुरु असतांना दुसरीकडे नैराश्यासह विविध कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढल्याचे चित्र असून कळवण उपजिल्हा रु ग्णालयात गेल्या चार महिन्यांत आत्महत्येच्या प्रयत्न करणारे १३१ रु ग्ण दाखल होऊन त्यांचा जीव वाचविण्यात रु ग्णालयाला यश आले आहे. या रु ग्णांमध्ये कळवण, देवळा, सुरगाणा, बागलाण तालुक्यातील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना, लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प झाले, अनेक कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती कोलमडली, अनेकांचा रोजगार गेला आहे. बाजारपेठ बंद झाल्याने व्यापारी, छोट्या व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले.
रोजगार नसल्याने तरु णांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढीस लागले. कौटुंबिक कलहामध्ये अनेकांनी जीवन संपवण्याच्या निर्णयामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. अनेक जणांचे जीव गेले असले तरी कळवण उपजिल्हा रु ग्नालयात दाखल झालेल्या रु ग्णांचे आयुष्य मात्र वाढले आहे. लॉकडाऊन काळातील आकडेवारी प्राप्त झाली असून आॅगस्ट महिन्यातील निश्चित आकडे मिळाले नाही.
आकडेवारी...
एप्रिल - १९
मे - ३४
जून - ३०
जुलै - ४८
कळवण उपजिल्हा रु ग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व सर्व सुविधा असल्याने रु ग्णांना तात्काळ उपचार मिळतात. आत्महत्या प्रकरणातील रु ग्ण विशेषत: विष प्राशन केलेले रु ग्ण बर्याचदा येतात. असे रु ग्ण वेळेत दाखल झाले तर त्यांचा जीव वाचवता येतो
- डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रु ग्णालय, कळवण.
आज आपली पिढी कोरोनाच्या संकटातून जात आहे, आणि आपल्याला समर्थपणे या संकटावर मात करायची आहे. मानसिक ताण, तणाव, नैराश्य, अपयश, भीती अशा विविध कारणांमुळे व्यक्ती एकाकी पडून आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. मात्र अशा परिस्थितीत आत्मविश्वास व योग्य सल्ला घेतल्यास आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. शैलेंद्र गायकवाड, समुपदेशक.