शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात दुचाकींची जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 16:57 IST

शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवतार पॉइंट बोरगड परिसरात गुरुवारी (दि.19) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात गुंडांनी भास्कर सोसायटीसमोरील मोकळ्या पटांगणात उभ्या केलेल्या तीन दुचाकींवर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे. दुचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाशिकच्या गुंडांच्या या विकृत कृत्याचे लोन संपर्ण  राज्यभर पसरले असताना  नाशिमध्ये पुन्हा गावगुंडानी अशा प्रकारे डोके वर काढून दुचाकींची डाळपोळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देम्हसरुळ परिसरात दुचाकी जवीत कांडदुचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्नअज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवतार पॉइंट बोरगड परिसरात गुरुवारी (दि.19) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात गुंडांनी भास्कर सोसायटीसमोरील मोकळ्या पटांगणात उभ्या केलेल्या तीन दुचाकींवर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे. दुचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाशिकच्या गुंडांच्या या विकृत कृत्याचे लोन संपर्ण  राज्यभर पसरले असताना  नाशिमध्ये पुन्हा गावगुंडानी अशा प्रकारे डोके वर काढून दुचाकींची डाळपोळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वाढणे कॉलनी अवतार पॉईंट बोरगड परिसरात असलेल्या भास्कर सोसायटी समोर पटांगणात रितेश लाटे यांची एक्सेस क्रमांक (एमएच 15 जीटी 7491), गणेश छगन खैरनार यांची सीडी डीलक्स (एमएच 15 एफपी 8361), व रवी लाटे यांची (एमएच 15 सीसी 4952) अशा तीन गाड्या उभ्या होत्या. या तिन्ही दुचारी रात्रीच्या सुमाराला गावगुंडांनी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने दुचाकी जाळपोळीचे कृत्य केले आहे. सदरची घटना सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर काही जणांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकीने पेट घेतल्याने आगीने काहीकाळ रौद्ररूप धारण केले होते. दुचाकी पूर्णपणे जळाल्याने लाटे व खैरनार यांचे आर्थिक नुकसान झाले असून दुचाकींचे केवळ सांगाडे शिल्लक आहे. याबाबत अज्ञात संशयित आरोपींविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरगड परिसरातील वाढणे कॉलनीत दुचाकींची जाळपोळ झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी म्हसरुळ शिवारात व मखमलाबाद या भागात दुचाकी जाळपोळची घटना घडली होती. बोरगड येथे घडलेल्या घटनेप्रकरणी रितेश भाऊसाहेब लाटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते, म्हसरूळ पोलीस निरीक्षक संजय सांगळे आदींसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र अद्याप जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी कोणत्याही संशयिताला ताब्यात घेतलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस आर पाटील करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसmotercycleमोटारसायकल