ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्ना

By Admin | Updated: June 26, 2015 01:54 IST2015-06-26T01:53:35+5:302015-06-26T01:54:58+5:30

ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्ना

Attempt to throw a robbery at a jewelry store | ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्ना

ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्ना

सिडको : अंबड गावातील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात संशयितांना अंबड पोलिसांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतले. संशयितांकडून तलवार, कोयता, कटावण्या यासह स्कॉर्पिओ व इनोव्हा या दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दिली.
महिनाभरापूर्वीच कारागृहातून सुटलेला सराईत गुन्हेगार गिरीश शेट्टी (रा. दहीपूल, नाशिक) याबरोबरच सुनील काजळे (पिंपळगाव बहुला), अनिरुद्ध शिंदे (रा. म्हसरूळ), गणपत शिंदे (रा. विल्होळी) तसेच सुनील काजळे, राहुल पिटे, रोशन पगारे (तिघे रा. सुरगाणा) आदि सात संशयितांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबड पोलिसांचे पथक गस्त घालत असताना एका हॉटेलमध्ये गुन्हेगार दरोड्यात तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळाली.

Web Title: Attempt to throw a robbery at a jewelry store